माझ्या आधीच्या आणि माझ्या पिढीच्या पोरांमधे कमल हासनबद्दल एक वेगळा कोपरा आहेच. सन्नीपासून अमीरपर्यंत आणि हृतिकपासून सलमानपर्यंत कुणाचेही फॅन असले तरी कमल हासनची गोष्ट वेगळी आहे. मुंबई टाइम्समधे असताना मी थोडंफार सिनेमावर लिहिलं. तेव्हा कमलचा 'दशावतार' हिंदीत डब होऊन मुंबईत रिलीज झाला होता. त्याच्या हासनच्या यात दहा भूमिका होत्या. मुखवट्यांच्या या खेळात तो 'अप्पू राजा'पासून रमलाय. त्यात त्याचा खरा चेहराच हरवलाय का, असा माझा प्रश्न होता. त्याचा सिनेमा कितीही बकवास असला तरी कुठूनतरी आपल्याला समृद्ध करून जातो, असा माझा अनुभव आहे.
मी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो? म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.
Showing posts with label मुंबई टाइम्स. Show all posts
Showing posts with label मुंबई टाइम्स. Show all posts
Friday, 20 May 2011
Wednesday, 18 May 2011
तरुणांचा तुकाराम
या शनिवार रविवारी म्हणजे २१ आणि २२ तारखेला पुण्यात पहिलं ‘बहुजन संत साहित्य संमेलन’ होतंय. देशभरातून वक्ते त्यात बोलत आहेत. त्याच्या आयोजकांशी माझा तसा थेट परिचय नाही. तरीही त्यांनी मला बोलवलंय, याचा आनंद आहे. त्यात २२ तारखेला सकाळीच सकाळी ‘संतसाहित्य आणि प्रसारमाध्यमं’ असा एक परिसंवाद आहे. हरी नरके, बबन नाखले अशा जाणकार माणसांबरोबरच मीही त्यात बोलणार आहे. बोलायचा प्रयत्न करणाराय.
आता बोलायचं म्हटल्यावर तयारी हवी म्हणून आता थोड्या वेळापूर्वीच मावलींची ज्ञानेश्वरी काढलीय, तुकाराम महाराजांची गाथा काढलीय. सदानंद मोरेंचं तुकाराम दर्शन तर मास्टरपीसच आहे. सोबतीला आ. ह. साळुंखेंचं विद्रोही तुकारामही आहे. सोबत नामदेव आणि चोखामेळ्यांवरचीही दोनदोन पुस्तकं काढलीत.
पुस्तकं उघडण्याआधी थोडं आपल्याच दामन में झाकून बघणं गरजेचं वाटलं. कारण विषय थेट आपल्याशी जोडलेला आहे. मीडियात आहोत तर आपण संतसाहित्यावर काय काय काम केलंय ते तपासायला हव, असं वाटलं. फार काही हाताला लागलं नाही. आणखी करायला हवं होतं असं वाटलं. महाराष्ट्र टाइम्सने सांस्कृतिक विशेषांक काढले. त्याच्या पहिल्या अंकात बडव्यांवर लिहिल्याचं लगेच आठवतंय. त्याचं श्रेय जयंत पवारांना. त्यांनीच आषाढी विशेषांकांत वारीचं मॅनेजमेण्ट या विषयावर डब्बेवाल्यांशी बोलून लेख करायला लावला होता.
Thursday, 5 May 2011
मराठी बाण्याचा असाही इतिहास
मी पेपरात लिहायला सुरुवात केली ती बॉलीवूडच्या रिपोर्टिंगनेच. सांस्कृतिक वगैरेच करायची इच्छा होती. राजकारण समाजकारणावर लिहिन असं कधी वाटलं नव्हतं तेव्हा. आता राजकारण समाजकारणावर नेहमी लिहिताना क्वचित कधीतरी फॉर अ चेंज नाटक सिनेमावर लिहिलंय अधूनमधून.
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ रिलिज झाला तेव्हा हा लेख लिहिलाय. मला तो सिनेमा बिलकूल आवडला नाही. क्वचित काही डायलॉग सोडले तर त्यात काही घेण्यासारखं नव्हतं. त्यातल्या शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज कळलेच नव्हते. त्यातले चमत्कार करणारे, झिंगलेल्या डोळ्यांचे शिवराय बघणं म्हणजे शिवरायांचा अपमानच होता. तरीही हा सिनेमा धो धो चालला. कारण एकच त्याने मराठी माणसाच्या दुख-या नसेवर बोट ठेवलं होतं. ही नस ज्याला सापडली तो जिंकला. राजकारणातल्या राड्यांमधेही आपल्या सगळ्यांचा हाच अनुभव आहे.
मुंबई टाइम्सची कव्हर स्टोरी म्हणून मी मराठी बाण्याचा एक वेगळा इतिहास मांडायचा प्रयत्न केला होता. नाटक सिनेमातून मराठी बाणा कसाकसा व्यक्त झालाय, त्यावर हा लेख होता. त्याचा इण्ट्रो असा होता, ‘मराठी माणूस खरं तर जगभर विविध क्षेत्रांत आघाडीवर आहे. पण मुंबईत होणा-या ख-या खोट्या कुचंबणेने तो असुरक्षिततेच्या कोषातही अडकलाय. त्याचा हा विविधरंगी मराठी बाणा सिनेमा नाटकांतून अनेकदा व्यक्त झालाय. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा त्याचा लेटेस्ट अविष्कार.’ पण शिवाजीराजेनेही मराठी बाण्याचा ट्रेण्ड काही उभा राहिला नाही.
Thursday, 3 March 2011
इम्प्लिमेण्टिंग मराठी बाणा
एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन. त्यादिवशी माझा मित्र शैलेश निपुणगेचा वाढदिवस असतो. कॉलेजात असताना त्याला जागतिक एड्स दिनाच्या शुभेच्छा असं लिहिलेलं ग्रिटिंग दिलं होतं. त्यामुळे हा एक दिवस सोडला, तर बाकीचे असे जागतिक वगैरे दिनही लक्षात नसतात आणि कुणाच्या वाढदिवसाच्या तारखाही.
आता लग्न झाल्यामुळे बायकोचा, मुलाचा आणि लग्नाचा वाढदिवस वगैरे लक्षात ठेवावा लागतो. बाकी स्वतःचा वाढदिवसही लक्षात नाही, अशीही वर्षं गेली. तारखा किंवा एकूणच आकड्यांशी आपला आकडा तसा छत्तीसचाच. त्यामुळे विशेष दिवसांचं वगैरे कौतूक असायचा प्रश्नच नाही. आता मराठी भाषा दिनाचंही तसंच. मला वाटतं मराठी बाणा जपण्यासाठी आपण कोणत्याही दिवशी थोडसं जरी पाऊल उचललं, तर तो आपल्यासाठी मराठी भाषा दिनच.
Thursday, 17 February 2011
वी फॉर वजायना
काल अचानक दादर स्टेशनावर वंदना खरे भेटल्या. त्यांच्या ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’चा ७५ वा प्रयोग होतोय. एकूण नव्या मराठी संस्कृतीसाठी हा एक मोठा ठेपा मानायला हवा. ‘वजायना मोनोलॉग’सारख्या अनेक दृष्टीने क्रांतिकारक नाटकाचा मराठीत प्रयोग यशस्वी होतोय. हे मराठी माणूस बदलतोय याचंच द्योतक मानायला हवं. ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’च्या प्रवासात माझाही एक छोटासा वाटा आहे. खारीपेक्षाही लहान.
मुंबई टाइम्समधे असताना वॅलंटाइन डे च्या दिवशी काहितरी वेगळं करावं, असं डोक्यात होतं. आठवलं. १४ फेब्रुवारीलाच जगभर वी डे साजरा होतो. इथे वी म्हणजे वॅलेटाइन नाही तर वजायना. वजायना म्हणजे योनी. वजायना मोनोलॉगवर लिहायचं ठरवलं. वीकेण्ड पुरवणीची कवरस्टोरी करायचं ठरवलं. नेटवर सर्च केला. वी डे डॉट ऑर्ग नावाची वेबसाईटच मिळाली. त्यावर सविस्तर माहिती मिळाली. शिवाय यंदाच्या वी डे निमित्त जगभर कोणते कार्यक्रम होणार याची यादीही. त्यात मुंबईत वंदना खरे या नाटकाचा मराठी प्रयोग करणार असल्याची नोंद होती.
Tuesday, 8 February 2011
गणपती टॉप टेन
गणपतीबाप्पा वर मी लिहिलेला हा आणखी एक लेख. यात बाप्पाच्या गाण्यांवर लिहिलंय. मुंबई टाइम्स ऑन सॅटर्डे म्हणजेच मॉसची ही कवरस्टोरी होती. लिहिताना खूप लोकांशी बोललो होतो. छान गंमत आली. नवीन माहिती मिळाली.
यातही माझी बायलाइन दिली नव्हती. तरीही लेख आवडल्याचे दोन चार एसेमेस आले होते. काल माघी गणपती म्हणजे गणेशजयंती झाली. मुंबई कोकणात अनेक ठिकाणी घरात आणि सार्वजनिक गणपती आलेत. ते निमित्त हा लेख अपलोड करण्याचं.
Monday, 7 February 2011
बाप्पा आणि लीडरशीपचे फण्डे
आज गणपती बाप्पाचा हॅप्पी बर्थ डे. आपण आस्तिक असो, वा नास्तिक. सगळ्यांनी तो सेलिब्रेट करायलाच हवा. कारण बाप्पा हा फक्त देव कुठेय? तो आपल्याला रोजच जगताना कुठे कुठे भेटत असतो. कम्प्युटर वॉलपेपरांपासून पेपरांच्या मास्टहेडपर्यंत कुठेही.
खुदा नहीं न सही, आदमी का ख्वाब सही,
कोई हसीन नज़ारा तो हो, नज़र के लिए
असं दुष्यन्त कुमारनं लिहून ठेवलंय. ते मला बाप्पाच्या बाबतीत खूप खरं वाटतं. दरवर्षी तो घरी येतो. आठवडाभर पाहुण्यासारखा थांबतो. आवडीने पाहुणचार घेतो. जन्मभराचा सोबती होऊन जातो.
Monday, 3 January 2011
हॅपी न्यू इयर
एक माझा मित्र आहे, निनाद नावाचा. तो फ्रीलान्स पत्रकार आहे आणि चांगला इवेंट मॅनेजरही. भरपूर बोलतो, बडबडतो. मी मुंबई टाइम्सचा प्रमुख असताना तो तिथे नव्याने लिहायला लागला. त्यासाठी त्याने फोन केला होता. सगळं बोलून झाल्यावर त्यानं सांगितलं तुमचा एक लेख मी लॅमिनेट करून माझ्या ऑफिसातल्या डेस्कवर लावलाय. खरं खोटं निनाद जाणे. लेखाचं नाव होतं, 'हकुना मटाटा'.
Wednesday, 8 December 2010
हगायचं नि जगायचं?
सालं तू मटाला बाटवलं होतंस, कालच माझा मित्र श्रीरंग गायकवाड म्हणाला. संदर्भ होता माझ्या ‘शी!’ या लेखाचं. श्रीरंगच्याच गावच्या प्रगती बाणखेलेनं मुंबई टाइम्समधे ‘मनातलं’ हा कॉलम सुरू केला होता. त्यात आम्ही मटातलीच माणसं काहीतरी नॉस्टॅल्जिक ललित लिहायचो. त्यातला हा दुसराच लेख होता. शी!
जागेत बसवण्यासाठी तो छोटा लिहिला होता. पण अजून बरंच आहे. लेख लिहिलेल्याला अडीचेक वर्षं उलटून गेलेत. त्यानंतर मी बरंच लिहिलं. पण अजूनही या एकाच लेखामुळे मला ओळखणारे काहीजण आहेत. बोरिवलीचे एकजण तर मी दिसलो की हसायलाच लागतात. मी लिहिलेला पहिला आणि शेवटचा चांगला लेख, असंही काहीजणांचं म्हणणं आहे. तुम्ही तुमचंही मत बनवायला हरकत नाही. नेहमीप्रमाणे कटपेस्ट केलेला हा लेख.
Thursday, 4 November 2010
हॅपी दिवाळी!
|
Subscribe to:
Posts (Atom)