खूप महिने झाले हा ब्लाँग तयार करून. पण लिहिलं नव्हतं. आता पहिल्यांदाच लिहितोय कायतरी.
आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो. परळ भोईवाड्याला. वर दहिहंडी बांधली होती. खाली छोटं स्टेज. स्टेजवर एक फोटो. शेजारी ट्रॉफी. त्यावर माझं नाव. माझ्या हस्ते फोटोला हार घालण्यात येतो. दोन मिण्टं शांतता पाळ्णं. सगळे पाकळ्या फोटोवर भिरकवतात. जय जागेवाला मित्र मंडळ हंडी फोडतं. माझ्या हस्ते ट्रॉफी देण्यात येते. फोटोची पोझ. शेजारची पोरं ओरडतात. प्रवीण भुवड अमर रहें! अमर रहे!
इथेच गेल्या वर्षी हंडी फोडताना पाचव्या थरावरून प्रवीण खाली पडला होता. आणि मेला होता. मी त्याच्यावर एक लेख लिहिला. तेव्हा मी मटात होतो. माझा कॉलमही होता, विंडो सीट. लेखाचं नाव, हुतात्मा.
लेख छापून आला तो रविवार होता. सकाळपासून फोन एसेमेस. आजपर्यंत खूप लिहिलं. पण कुणाला मदत व्हावी, असा अजेंडा ठेवून कधी लिहिलं नव्हतं. पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. लोक प्रवीणचं घऱ शोधत आले. मदत देऊन गेले. आम्ही त्याच्या भावाचा फोन नेटवर दिला होता. अमेरिका, इंग्लंड, दुबईवरून फोन. काही लाखांची मदत आली. त्यात बाळा नांदगावकरांचे एक लाख. दगडू सकपाळांनी भावासाठी नोकरी तयार ठेवली. अगदी परवापर्यंत हे सुरूच होतं. ठाण्याचे आमदार राजन विचारेंनी एक्कावन्न हजार दिले. त्यापेक्षा महत्त्वाचं हे की प्रवीणच्या आईचा साडीचोळी देऊन सत्कार केला.
पण काही जणांना हे उगाचचं उदात्तीकरण वाटलं. जानी दोस्त सुनील घुमे आणि नीलेश बने तर तुटून पडले. जोरदार वाद झाला. हे व्हायलाच हवं. पण माझा मुद्दा वेगळाच होता. संस्कृती सर्वसामान्य माणसं जगवतात, टिकवतात. कष्टक-यांच्या कष्टाच्या संस्कृतीला मान्यता मिळत नाही. ती द्यायला हवी. एवढंच. आपण ज्याला नेहमी संस्कृती म्हणतो त्याहीपेक्षा ही संस्कृती महत्त्वाची आहे.
पण सगळ्यात चागली प्रतिक्रिया होती आमच्या प्रवीण मुळ्येची. दहिहंडी हा एक बीट बनू शकतो, एवढ्या बातम्या मुळ्यानं वर्षानुवर्षं दिल्यात. फडके सरांनी त्याला दहिहंडीवर पुस्तक लिहायला सूचवलं होतं. तू माहिती आण, मी लिहून काढतो, असं मीही त्याला सांगितलं होतं. मुळ्या फारसा तयार नव्हता. पण लेख वाचून तो आला, म्हणाला, पुस्तक लिहायला पायजे रे!
मूळ लेखाचा इण्ट्रो असा होता, 'गणपती , गोविंदा आणि डबेवाले. या तीन गोष्टी सोडल्या , तर मुंबईवर सांस्कृतिक ठसा उमटवणारं अस्सल मराठी काहीही उरलेलं नाही. म्हणूनच दहिहंडीच्या पाचव्या थरावरून पडून मेलेला प्रवीण भुवड हा मराठी संस्कृती टिकवण्यासाठी धारातीर्थी पडलेला हुतात्मा ठरतो.' लेख खाली कॉपीपेस्ट करतोय. बघा वाचून...