गेल्या गांधी जयंतीला मी एक लेख लिहिला होता. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता त्याचा. अकाऊंटंट असणा-या रुपेश नावाच्या एका मित्राने सांगितलं माझा गांधीजींकडे बघायचा दृष्टिकोनच बदललाय. माझ्यासाठी हे सगळ्यात मोठं सर्टिफिकेट होतं.
मी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो? म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.