रिंगण ने आणखी एक कार्यक्रम आयोजित केलाय. डॉ. सदानंद मोरे
यांची प्रकट मुलाखत. त्याचं हे निमंत्रण.
थोडी अधिक माहिती
डॉ. सदानंद मोरे
यांची प्रकट मुलाखत
महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ
विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या वयाची साठ वर्षं नुकतीच २५ जून २०१२ रोजी
पूर्ण केली. त्यांच्या या साठीनिमित्त ’मनोविकास प्रकाशन’ आणि ‘रिंगण’ आषाढी अंक यांनी
संयुक्तपणे त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन रविवार १ जुलै रोजी भारत इतिहास
संशोधन मंडळाच्या सभागृहात आयोजित केला आहे.
सर्वजनवादासारखी नवी विचारधारा मांडणारे विचारवंत, ‘तुकाराम दर्शन’ साठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, ‘लोकमान्य ते महात्मा‘ मधून इतिहासाची
बहुविद्याशाखीय माडणी करणारे समतोल इतिहाससंशोधक, पुणे विद्यापीठाच्या तुकाराम
अध्यासनाचे प्रमुख, श्रीकृष्णाच्या जीवनावर पीएचडी करणारे तत्त्वज्ञानाचे
प्राध्यापक, कवी, नाटककार, वक्ते, कीर्तनकार आणि प्रवचनकार डॉ. प्रा. सदानंद मोरे
यांनी विविध अंगांनी आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीवर प्रभाव टाकला आहे. त्याची
कृतज्ञता म्हणून ’मनोविकास प्रकाशन’ आणि ‘रिंगण’ आषाढी अंक यांनी
मोरे सरांच्या साठीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.