दिल्लीत असताना प्रमोद चुंचूवारच्या
पुस्तकांच्या कपाटात पहिल्यांदा लोकनाथ यशवंत भेटले. त्या कवितेनं हादरवून टाकलं.
तेव्हापासून लोकनाथ मनाचा एक भाग झालेत. पुढे आम्ही भेटलो. मित्र झालो.
वर्षभरापूर्वी मी त्यांच्यावरचा हा लेख लिहिला. त्यांच्या कवितांवरच्या
समीक्षालेखांचा संग्रह आला. `लोकनाथच्या यशवंत कविता` नावाचा. त्यासाठी हा लेख लिहिला होता. मला भेटलेले लोकनाथ असं या लेखाचं
स्वरूप होतं. लोकनाथजींना लेख आवडला. बरं वाटलं. मूळ लेखाचं नाव एकदम कडक असं
होतं. तो लेख ब्लॉगवर टाकतोय.
मी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो? म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.
Friday, 14 February 2014
Wednesday, 12 February 2014
आपल्या जननायकांसाठीचं युद्ध
क्रांतिवीर दीपाजी राणेंचं हे रेखाचित्र |
गोव्यात येऊन आता मला दहा महिने होऊन गेलेत. मी
बराच गोंयकार झालोय. फिरतोय, लोकांना भेटतोय, वाचतोय. जमेल तेवढा गोवा समजून
घेतोय. मजा येतेय. सगळ्यात आधी गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास वाचला. त्यात
सत्तरीच्या राण्यांचं बंड सापडलं. गोव्यात गेल्यावर सगळ्यात आधी साखळीच्या
विठ्ठलमंदिरात गेलो होतो. राणे घराण्याचा कुणीतरी पूर्वज याच पांडुरंगाला घेऊन
गोव्यात स्थायिक झाला होता. त्या विठ्ठलानं सत्तरीतल्या वाळवंटी नदीच्या पाण्यात चंद्रभागेतल्या
`पाईकां`चे जीन्स मिसळले असावेत बहुदा.
पोर्तुगिजांनी सत्तरी
तालुका ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून म्हणजे अठराव्या शतकाच्या
मध्यापासून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत राणे अखंड त्यांच्याशी लढत होते.
त्यातले क्रांतिवीर दीपाजी राणे आणि खूप नंतरचं दादा राणेंचं स्वातंत्र्यसंगर
सर्वात आकर्षक आहे. दीपाजींच्या स्मृती जागवण्यासाठी २६ जानेवारीला नाणूसच्या
किल्ल्यावर तरुण एकत्र झाले होते. दीपाजींचं कर्तृत्व मोठं असूनही त्यांच्या
नावानं कुठेच काही नाही. शाळेत धडे नाहीत, फार चांगली पुस्तकं नाहीत, स्मारक वगैरेही
नाही.त्यांच्याविषयी चांगलं बोलायला आजही काही लोकांची तयारी नाही, हे फेसबुकावरच्या चर्चेत दिसतंय. त्यावर गोवा पुढारीचे कार्यकारी संपादक प्रभाकर ढगेंनी दीपाजींवर पुस्तक लिहायचा संकल्प फेसबुकावर सोडलाय. त्यासाठी त्यांना शुभेच्छा!
मी लागोपाठच्या गेल्या दोन शनिवारी दोन लेख लिहिले. पहिला लेख दीपाजींच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्यात एकूणच लोकनायकांचं कर्तृत्व लोकांसमोर आणण्यासाठी कसे प्रयत्न सुरू असतात, त्यावर लिहिलंय. दोन्ही लेख इथेच पाठोपाठ टाकलेत.
मी लागोपाठच्या गेल्या दोन शनिवारी दोन लेख लिहिले. पहिला लेख दीपाजींच्या कर्तृत्वाची ओळख करून देण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्यात एकूणच लोकनायकांचं कर्तृत्व लोकांसमोर आणण्यासाठी कसे प्रयत्न सुरू असतात, त्यावर लिहिलंय. दोन्ही लेख इथेच पाठोपाठ टाकलेत.
Subscribe to:
Posts (Atom)