त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथांची समाधी |
कालच पुणे विद्यापीठातल्या संत नामदेव अध्यासनातून
दत्तोपासक सरांचा व्हॉट्सअप मेसेज आला होता. आज संत निवृत्तीनाथांची जयंती आहे. घरच्यांचेच
वाढदिवस लक्षात असतात ते नशीब. निवृत्तीनाथांची जयंती लक्षात राहणं कठीणच.
त्यामुळे दत्तोपासक सरांना थँक्स म्हणायलाच हवं.
यंदा निवृत्तीनाथांची जयंती विसरून कसं चालेल. २०१६चा
रिंगणचा अंक निवृत्तीनाथांवर करायचा, हे गेल्या वर्षीच्या रिंगणमध्येच ठरलंय.